तुमचे Vivaah खाते हटवा
ॲपमध्ये
- Vivaah उघडा आणि “प्रोफाइल” टॅबवर जा.
- “गोपनीयता आणि सुरक्षा” खाली “माझे खाते हटवा” वर टॅप करा.
- कारण निवडा, आणि मग आम्ही तुमच्या WhatsApp वर पाठवलेला कोड टाका.
काय होते
- लगेच: तुमची प्रोफाइल होम आणि शोधातून निघून जाते, तिचा तपशील पुसला जातो, प्रत्येक संवाद बंद होतो, प्रत्येक इंटरेस्ट संपतो, आणि प्रत्येक डिव्हाइसवर तुम्ही साइन आउट होता.
- त्यानंतर थोड्याच वेळात: तुमचे फोटो, बदलांचा इतिहास आणि जुळवणीची नोंद हटवली जाते.
- तुम्ही ज्यांना संदेश पाठवले, त्यांच्याकडे आधीच पोहोचलेले संदेश “माजी सदस्य” या नावाखाली, तुमच्या नावाशिवाय आणि फोटोंशिवाय राहतात. संदेशातील मजकुरावरून तरीही तुमची ओळख पटू शकते.
- खाते हटवल्यानंतरही आम्ही काही माहिती ठेवू शकतो, जसे तुमचा नंबर, हटवण्याची तारीख, आणि तुमच्या खात्याशी संबंधित रिपोर्ट आणि ब्लॉक, गोपनीयता धोरण मध्ये सांगितल्याप्रमाणे.
- तुम्ही पुन्हा नोंदणी करण्यास पात्र असल्यास, तुम्हाला नवीन प्रोफाइल सुरू करावी लागते. खाते हटवल्याने बंदी उठत नाही, आणि आधीचे ब्लॉक लागू राहतात.
- Vivaah खाते हटवल्याने marriagebiodata.app वरील तुमचे खाते किंवा बायोडेटा हटत नाही.
ॲपशिवाय
खालील विनंती पाठवा, किंवा “Delete my Vivaah account” हा इंग्रजी विषय आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर लिहून support@vivaah.app वर ईमेल करा. Vivaah पुन्हा इन्स्टॉल करण्याची गरज नाही. आम्ही विनंतीची पोच देतो, आणि काहीही हटवण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत WhatsApp नंबरवर तुमच्याकडून ती निश्चित करून घेतो. तो नंबर आता तुमच्याकडे नसल्यास, पडताळणीच्या दुसऱ्या पद्धतीसाठी आम्हाला ईमेल करा. विनंतीची पडताळणी झाल्यावर आम्ही खाते हटवतो, आणि ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला कळवतो.
तुम्ही इथे भरलेली माहिती आम्ही तुमच्या विनंतीची पडताळणी करण्यासाठी आणि ती हाताळण्यासाठी वापरतो. विनंती हाताळल्यानंतर आम्ही ती 90 दिवस ठेवतो, आणि मग हटवतो. नाव आणि टीप ऐच्छिक आहेत. एकदाच वापरायचा कोड किंवा ओळखपत्राची प्रत देऊ नका.